आमच्या विषयी

आम्ही कोण आहोत

श्री. महेश लक्ष्मण कर्डिले

प्रोप्रा. घोडनदी इस्टेट

मी श्री. महेश लक्ष्मण कर्डिले, रा. थापेमळा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असुन माझे बी.ए., बी.कॉम., एम.पी.एम. असे शिक्षण पुर्ण झाले असुन सध्या वकिलीचे शिक्षण घेत आहे. शिक्षण चालु असतानांच माझाही स्वतःचा एखादा वेगळा व्यवसाय असावा अशी लहानपासुनच इच्छा, आकांक्षा होती. कॉलेजचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न न करता एखादा नविन व्यवसाय करून त्यात यशस्वी व्हायचे असा मानस मनाशी बांधला होता. परंतु आज रोजी कोणताही व्यवसाय करायचे म्हटले तर त्या मध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असल्याने खुप मोठी रक्कम गुंतवून व्यवसाय करण्याचे धाडस होत नव्हते. त्यामुळे मी आमचें बंधु अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले यांच्या पावलावर पाऊल ठेवत वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असुन आमचें बंधु अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले यांच्या समवेत सदर व्यवसायात हातभार लावत आहे. आमचें बंधु अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले हे त्यांच्या वकिली व्यसायात अ‍ॅड. सागर सुभाष गायकवाड यांच्यासह कन्व्हेसिंग प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे मीही त्यांच्या ऑफिसमध्ये जात असता मला स्थावर मिळकतीबाबत खरेदी-विक्री संदर्भात असलेल्या लोकांच्या समस्यांविषयीचे प्रश्न प्रगल्भतेने जाणवले. त्यामुळे मी आमचें बंधु अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले, अ‍ॅड. सागर गायकवाड आणि अ‍ॅड. गणेश बाजीराव कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे स्वप्नात असलेला वेगळा असा व्यवसाय असावा म्हणुन समाजातील गरज ओळखुन अगदी माफक शुल्कात सदरचा व्यवसाय सुरू करीत आहे. त्यास आपला सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा करतो.


अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले

कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर अ‍ॅडव्होकेट, शिरूर.

अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डिले, हे थापेमळा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असुन त्यांनी सन 2010 मध्ये वकिलीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर वकिलीमध्ये कोणताही वारसा नसल्याने शिरूर या ठिकाणी अ‍ॅड. सागर सुभाष गायकवाड यांचे समवेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कन्व्हेसिंग प्रॅक्टिस (सर्व प्रकारचे दस्तऐवज म्हणजेच खरेदीखत, साठेखत, करारनामा, गहाणखत, अभिहस्तांतरणपत्र, बक्षिसपत्र, संमतीपत्र इ.प्रकारचे दस्त नोंदविण्याचे काम) चालु केले. सदर कामांचा त्यांना गेल्या आठ वर्षांपासुन चा अनुभव आहे. त्यांना व त्यांचे सिनियर अ‍ॅडव्होकेट सागर गायकवाड व सहकारी अ‍ॅड. गणेश कर्पे यांना श्री. महेश लक्ष्मण कर्डिले यांनी सुचविलेल्या या घोडनदी इस्टेट च्या व्यवसायाबाबत सुसंघटीत वाटल्याने त्यांनी हा व्यवसाय चालु करण्यास स्वतः पाठबळ देवुन प्राधान्य दिले. सदर व्यवसायामुळे साहजिकच जनतेचा वेळ व पैसा यांची बचत होणार असल्याने सदरचा व्यवसाय जनतेच्या हिताचा वाटत आहे. त्यामुळे त्यांनीही सदर व्यवसायाच्या माध्यमातुन होणार असलेल्या कामांचा जास्तीत जास्त लोकांचा फायदा कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविले.




अ‍ॅड. सागर सुभाष गायकवाड

दिवाणी व फौजदारी प्रॅक्टिशनर अ‍ॅडव्होकेट, शिरूर.

अ‍ॅड. सागर सुभाष गायकवाड, हे शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असुन त्यांनी अहमदनगर येथुन एल.एल.बी. व पुणे येथुन एल.एल.एम. या पदवीचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षण चालु असताना फौजदारीचे अहमदनगर येथील विधीज्ञ अ‍ॅड. ठुबेपाटील यांचेकडे 2 वर्षे व दिवाणीचे विधिज्ञ अ‍ॅड. बेंद्रे यांचेकडे 2 वर्षे प्रक्टिस केली. सदर प्रॅक्टिसच्या माध्यमातुन त्यांनी दिवाणी व फौजदारी प्रकरणांचे मार्गदर्शन घेवुन 2010 मध्ये शिरूर येथे त्यांचे वडील व जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस.वाय.गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्वतंत्र प्रॅक्टिस चालु केली. शिरूर येथे दिवाणी व फौजदारी प्रकरणे चालवित असताना त्यांनी त्यासोबतच कन्व्हेसिंगची प्रॅक्टिस देखील चालु केली. त्यामाध्यमातुन अनेक बिल्डर्स व स्थावर मिळकती खरेदी-विक्री क्षेत्रात असलेल्या व्यक्तिंची कायदेशीर कामे केली. त्याच वेळेत कार्पोरेशन बँक, गृह फायनान्स व इतर बँकांचे सर्च रिपोर्ट, गहाणखते व इतर कामे करत गेले. ही कामे करत असताना त्यात आणखी भर पडुन ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व पंजाब नॅशनल बँकचे देखील कामे करण्याची संधी त्यांचे वडीलांचे माध्यमातुन मिळाली. अशा प्रकारे त्यांना आजपर्यंत सुमारे 10 वर्षांचा अनुभव तयार झाला. शिक्षण चालु असताना त्यांनी डी.ए.डी.आर. चा स्वतंत्र अभ्यासक्रम केला असल्यामुळे त्यांनी एमआयडीसी मधील अनेक कंपण्यांचे पॅनल अ‍ॅडव्होकेट म्हणुन नेमणुक होवुन लेबर व इंडस्ट्रियल चे देखील कामे मोठया प्रमाणात केलेली आहेत. अशा प्रकारे अ‍ॅड. सागर गायकवाड यांना त्यांचे सर्वांगिन कामाचा व विधिज्ञ क्षेत्रातील कायदेशीर कामांचा अनुभव आपणांस मिळणार आहे.


अ‍ॅड. गणेश बाजीराव करपे

रेव्हेन्यु/को-ऑपरेटीव्ह प्रॅक्टिशनर अ‍ॅडव्होकेट, शिरूर.

अ‍ॅड. गणेश बाजीराव करपे, हे मुळचे रा. गुनाट ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असुन त्यांनी सन 2013 मध्ये वकिलीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर मे.घोडनदी येथील कोर्टात अ‍ॅड. सागर सुभाष गायकवाड व अ‍ॅड. निलेश लक्ष्मण कर्डीले यांचे समवेत सुरूवातीच्या काळात तहसिलदार कार्यालयातील लोकांचे रस्त्या संदर्भातील अडचणी, सातबारा दुरूस्ती संदर्भातील कामे केली सदर कामे करत असताना भुमी अभिलेख कार्यालयातील संबधित कामे केली व करत आहे. महसुल विभागामधील फेरफार संबधित अर्ज, अपिले, खरेदीखताच्या नोंदी या साठी प्रांत अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, यांचे कडे अपिल करून या संदर्भात कामे करत आहेत. त्याचबरोबर सहकार आयुक्त/धर्मादाय आयुक्त या विभागतीलही कामे करत आहेत. सदर कामांचा त्यांना गेल्या पाच वर्षांपासुनचा अनुभव आहे. सदर काम करत असताना लोकांना त्यांचे प्रॉपर्टी खरेदी करणे अथवा विक्री करणेसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात आलेमुळे लोकांना विश्वासदर्शक मार्गदर्शन मिळणेसाठी त्यांनी सदर व्यवसायाला पाठबळ देवुन घोडनदी इस्टेट मध्ये कायदेशीर सल्लागार अथवा त्या संर्भातील कामे करून लोकांना त्यांची कामे एकाच ठिकाणी कमी खर्चात कशा प्रकारे होतील असे लोकहित लक्षात घेवुन त्यादृष्टीने मार्गदर्शन होणार आहे.




आमच्या कामाची वैशिष्टे व आमच्याकडील फायदे

स्थावर मिळकती म्हणजेच शेतजमीन, फ्लॅट, घरे, रो-हाउस, बंगलो, दुकाने, शॉप्स, ऑफिसेस, एन.ए. प्लॉट, कमर्शिअल व इंडस्ट्रियल प्लॉटस्, गोडावुन, बिल्डींग इ. विक्री अथवा खरेदी करण्यासाठी आमचेकडे विनामुल्य नाव नोंदणी केलेनंतर आम्ही खरेदीदार अथवा विक्रेता यांना त्यासंबंधीत माहिती देवुन आपणांस समोरासमोर बसवुनच आपण आपल्या स्वरूपानुसार व्यवहार करावयाचा आहे. तसेच आपण आमचेकडे तुमच्या स्थावर मिळकती 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भाडेपटयाने देणे आणि ओपन प्लॉट विकसनासाठी देणे-घेणे संदर्भातही नाव नांेदणी करू शकता. अशा पध्दतीने व्यवहार पुर्ण झालेनंतरच तुमचेकडुन आम्ही आमचा सव्र्हिस चार्ज स्वरूपात फी म्हणुन फक्त रक्कम रू. 10,000/-घेणार असुन याव्यतिरिक्त कोणतीही वाढीव रक्कम अथवा कमिशन म्हणुन कोणतीही रक्कम न घेता तुमचा व्यवहार हा तुम्हीच करावयाचा आहे. आपण स्वतः नाव नोंदणी केल्यामुळे व पुढील संपुर्ण व्यवहार हा आपण स्वतःच करणार असल्यामुळे साहजिकच होणारा व्यवहार हा पारदर्शक होणार आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये असलेली तफावत, कमिशन याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. त्यामुळे आपणाला आपल्या अपेक्षित रक्कमेत स्थावर मिळकतींची खरेदी अथवा विक्री करणे अगदी सोपे होणार असुन आपला बहुमल्य वेळ व बऱ्याच मोठ्या रकमेचाही फायदा नक्कीच होणार आहे.

आम्हालाच प्राधान्य का दयावे ?

आमचा व्यवसाय अगदी आगळा-वेगळा स्वरूपाचा असुन असा व्यवसाय आपणाला स्थावर मिळकतींच्या खरेदी-विक्री क्षेत्रात असल्याचा दिसणार नाही. आमच्याकडे विनामुल्य नाव नोंदणी केल्यामुळे आपल्याला स्थावर मिळकतींच्या खरेदी-विक्री क्षेत्रात असलेल्या व्यवहाराची पारदर्शकता व मध्यस्थांना दिली जाणारी रक्कम याचा खुप मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच व्यवहारामध्ये पारदर्शकता, गोपनीयता व विश्वासहर्ता यांचे आम्ही काटेकोरपणे पालन करणार असल्याने निश्चितच या बाबतीतही खुप मोठा फायदा स्थावर मिळकतींच्या खरेदी-विक्री क्षेत्रात होणार आहे. तसेच आपला व्यवहार पुर्ण झालेनंतर अथवा पुर्ण करणेपुर्वी त्याची कायदेशीर संपुर्ण प्रकरणे आमच्याकडे करावचायी असल्याने आम्ही त्याची सुविधा ही अगदी माफक फीमध्ये देणार आहोत. त्यापुर्वी व्यवहार पुर्ण करताना असणाऱ्या अडी-अडचणींसाठी आमचे विधिज्ञ/वकील मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत.


आमचा अनुभव व आमचा स्टाफ

आमच्याकडे वरील कामांमुळे अनेक लोक जोडली गेली. सदनिकेंच्या व्यवहारामुळे अनेक बिल्डर्स आम्हाला जोडली गेली. आम्ही सुध्दा ज्या लोकांचा व्यवहार पुर्ण झाला अशा व्यक्ति त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक यांना घेवुन आमचेकडे आले असता आम्ही कोणतीही फी न घेता फक्त आम्ही केलेल्या कायदेशीर कामांचीच फी घेवुन उत्तम दर्जाची सेवा देवुन व मोठया प्रमाणात व्यवहार पुर्णत्वास नेल्याने आमचेकडे काम केलेला समाज खुप आनंदी आहे. सदर व्यवसायाच्या माध्यमातुन आम्ही आपल्या अडी-अडीचणींसाठी आमचेकडे पुर्णवेळ विधिज्ञ कार्यालयात उपलब्ध राहणार असुन सदर व्यवसायाची सेवा देण्यासाठी दोन व्यक्तिंचा स्टाफ व एक ऑफिसबॉय असा स्टाफ कार्यरत आहेत. आम्ही दस्त नोंदणी, सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस इ. कायदेशीर कामे करण्यासाठी अ‍ॅड. निलेश कर्डिले, अ‍ॅड. सागर गायकवाड व अ‍ॅड. गणेश कर्पे यांची मदत घेत आहोत. खरेदी, विक्री व इतर कामांसाठी आम्ही व त्याचेशी निगडीत क्षेत्रामधील अनुभवी व्यक्तींची मदत घेत आहोत. उदा. 7/12 उतारा, सिटी सव्र्हे उतारा, रेव्हेन्यु रेकॉर्डस् व फेरफार इत्यांदी साठी स्वतंत्र अनुभवी व्यक्तीची नेमणुक केलेली आहे. त्याचप्रमाणे जमिनीची मोजणी, फाळणीबारा व त्यांसबधीत नोंदी या कामांसाठीही स्वतंत्र व्यक्तीची नेमणुक केलेली आहे. त्याचबरोबर जमिन बिगरशेती (N.A.) करणे, शर्त कमी करणे, इतर शासकीय परवानग्या घेण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची नेमणुक केली आहे. त्याचबरोबर नगरपालिका व पी.एम.आर.डी.ए. मार्फत बांधकाम परवाने मंजुर करणेकामी व त्याचे निगडीत मार्गदर्शनाखाली देखील अनुभवी इंजिनियर/आर्किटेक्ट यांचेशी मदतीचा करार केलेला आहे.

आमची अपेक्षा

आमच्या फर्मची आपणाकडुन अशी अपेक्षा आहे की, आज खरेदी-विक्री व्यवहारात सर्रासपणे दोन टक्के कमिशन किंवा त्याही पेक्षा मोठी रक्कम मध्यस्थींना दयावी लागते. तरीसुध्दा बऱ्याच वेळा व्यवहार झाल्यानंतर तो पारदर्शक झाला की नाही, याबाबत शास्वती नसते. तसेच भविष्यात बऱ्याचश्या व्यवहारबाबत वाद होवुन कोर्ट-कचेरीही करावी लागते. जर तुम्ही आमच्यामार्फत व्यवहार केला तर आम्ही आमची माफक फी वगळता आपणाकडुन कोणत्याही प्रकारची वाढीव रक्कम आम्ही घेणार नाही. त्यामुळे साहजिकच आपले मेहनतीचे दोन टक्के कमिशनपोटी दयावे लागणाऱ्या रक्कमेचीही बचत होणार आहे व होणारा व्यवहारही पुर्णपणे पारदर्शक होणार आहे. त्यामुळे आमची एकच अपेक्षा आहे की, आमचे कार्यालयाशी 30 वर्षांहुन अधिक प्रॅक्टिस केलेले दिवाणी व फौजदारी विधिज्ञ निगडीत असल्याने तुमचा व्यवहार पुर्णत्वास नेणेकामी आवश्यक असणारी कायदेशीर कामे आमच्या कार्यालयाकडुनच करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारे कोर्ट-कचेरींच्या त्रासाला सामोरे न जाता त्यापासुन होणारे मानसिक त्रास, भांडण-तंटा यापासुन होणाऱ्या बहुमुल्य वेळ व पैशांची बचत होणार आहे.