खरेदी - विक्री व प्रॉपर्टी डेव्हलोपमेंट
प्रॉपर्टी खरेदी, विक्री, भाडेपटयाने देणे अथवा ओपन प्लॉट विकसनासाठी देणे-घेणे हि आपणस स्वतः समोरासमोर बसवून व्यवहार पारदर्शक पणे करायचा आहे.
कायदेविषयक मार्गदर्शन
प्रॉपर्टी खरेदी - विक्री व्यवहार पुर्ण करताना येणाऱ्या अडी-अडचणींसाठी आमचे विधिज्ञ/वकील कायदेविषयक मार्गदर्शन करतील.
दस्तऐवजची कामे
आम्ही सर्व प्रकारचे दस्तऐवज म्हणजेच खरेदीखत, साठेखत, करारनामा, गहाणखत, अभिहस्तांतरणपत्र, बक्षिसपत्र, संमतीपत्र, भाडेपट्टा, लिव्ह अँड लायसेन्स, विकसन करारनामा, हक्कसोड, विसारपावती, भरणा पावती इ.प्रकारचे दस्त नोंदविण्याचे काम अगदी माफक शुल्कात करतो.
आमच्या कामकाजाबद्दल
मॅनेजमेंट
आम्ही आपल्या मिळकती खरेदी अथवा विक्री करणेसाठीची नाव नोंदणी संकेतस्थळावर व कार्यालयामध्ये करून घेणार असुन नाव नोंदणी झालेनंतर त्यासंबधित लगेचच असलेली माहिती एकमेकांस दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तिंची पसंती झालेनंतर आमच्या कार्यालयात बैठक करून व्यवहार ठरविण्याचा आहे. व्यवहार ठरविलेनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आमचे मार्फत करून व्यवहार पुर्णत्वास नेण्याचा आहे.
कायदेशीरपणा
आम्हांला माहिती प्राप्त झालेनंतर आमचे विधिज्ञांमार्फत कागदपत्रांची पाहणी करून त्याची सत्यता पाहुन त्याची नाव नोंदणी केली जाणार आहे. नाव नोंदणी झालेनंतर आम्ही सव्र्हिस अग्रीमेंट करून त्यावर सहया झाल्यानंतरच तसेच ऑनलाईन नाव नोंदणी केलेनंतर अटी व शर्तींवर होकार आल्यानंतरच आम्ही त्यासंबधीत माहिती पुढील इच्छुक व्यक्तिला कळविणार आहे.
रिस्पॉन्स
आमचेकडे यशस्वीरीत्या नाव नोंदणी झालेनंतर त्याचा आम्हांला व तुम्हाला एक एस.एम.एस. येईल. त्यानंतर आम्ही लगेचच संबधित माहितीची पडताळणी करून अपेक्षेनुसार समोरील व्यक्तिला त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच नव्याने नोंदणी झाल्यानंतरही त्याबाबत पुन्हा पुन्हा पाठपुरावा संबंधितांकडे आमचेकडुन केला जाणार आहे.
सत्यता
आमच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तिने आमच्या अटी व शर्ती मान्य केल्यानंतर आमचेकडुन अशा स्थावर मिळकतींची विक्री अथवा खरेदी करणेसाठी माहिती दिली जाणार आहे. खोटया स्वरूपाची माहिती अथवा त्याबाबत काही शंका वाटल्यास किंवा अशा माहितीने एखादयाला त्रास होईल असे वाटल्यास आम्ही त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून ती माहिती उगीचच समोरील व्यक्तिंना आमचेकडुन दिली जाणार नाही याची आम्ही पुर्णपणे काळजी व दक्षता घेणार आहोत.