नियम व अटी / Terms and Conditions

तुम्हीं स्थावर मिळकती विक्री/अथवा खरेदी करणे संदर्भात आमचेकडे विनामुल्य नाव नोंदणी करण्याकरीता आमचे असलेल्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.


1. व्यवहार पुर्ण झाल्यानंतर सेवा शुल्क (Service Charge) म्हणून तुम्हांला आमचेकडे लगेचच रक्कम रू. 10, 000/- रोख अथवा IMPS स्वरूपात जमा करावे लागतील.
2. व्यवहारासंबंधातील असलेली सर्व कायदेशिर प्रक्रिया करणेकामी आमच्या कार्यालयामार्फतपुरविण्यात येणाऱ्या सेवांची फी खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं.
दस्त ऐवज प्रकार
कार्यालय फी
इतर
विसार पावती
रू. 1, 500/-
नोटरीसह
पेपर नोटीस
रू. 1, 500/-
अधिक पेपर कंपणीचे शुल्क
सर्च रिपोर्ट (आपल्या इच्छेखातर)
रू. 5000/-
कागदपत्रे सोडुन
खरेदीखत, साठेखत, करारनामा, साठेखतावरून खरेदीखत, संमतीपत्र, हक्कसोडपत्र, वाटपपत्र, विकसनकरारनामा, कुलमुखत्यारपत्र, इ. प्रकारचे कोणतेही नोंदणी करणार असलेले दस्तऐवज
रू. 8, 000/-
मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व पावती सोडुन तसेच दस्त किचकट असल्यास (अधिक नावे, अधिक मिळकती असल्यास) त्याप्रमाणे अधिक फी
खरेदीच्यासंबंधातील नोटरीदस्त (भरणापावती, मुदत करारनामा, हमीपत्र इ.)
रू. 1500/-
अधिक स्टॅम्प
खरेदीपूर्वी किंवा खरेदीनंतर जागेची खाजगी मोजणी
रू. 2000/-(प्रति एकर/प्लॉट)
अधिक अंतर लांब असल्यास भाडे सोडुन
सरकारी मोजणी
सरकारी नियमाप्रमाणे
-
सात बारा, सिटी सर्वे, आठ अ उतारा इ. ठिकाणी नोंद लावणे
रू. 4, 000/-
गुंतागुंतीचे असेल तर त्याप्रमाणे अधिक शुल्क

याप्रमाणे कामे व त्यासंबधीची फी तुम्हाला मान्य व कबुल असुन त्याबाबत तुमची कुठलिही हरकत असणार नाही.
3. सर्व प्रकारचे दस्ताऐवज हे तुमचे इच्छेनुसार/सांगण्यावरून लिहीले जातील. त्यासाठी संबंधितांनी एकमेकांस सहकार्य करावे लागेल.
4. व्यवहार पुर्ण झाल्यानंतर जी रक्कम असेल ती मिळवणे/देणेकामी तुम्ही स्वतः प्रयत्नशील राहील, त्याची कोणत्याही प्रकारची जबाबदारी आमच्या कार्यालयावर नसेल.
5. व्यवहार पारदर्शक होणेसाठी मुळ मालक घेणार व मुळ मालक देणार यांनी स्वतः अथवा कायदेशीर कुलमुख्यत्यारधारक यांनी समोरासमोर भेटून/चर्चा करून व्यवहारा संबंधी बोलणी करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारे त्रयस्थ व्यक्ती यांचा हस्तक्शेप असणार नाही याची हमी तुम्ही आम्हाला दिलेली आहे.
6. जमिन/प्लॉट खरेदीकरण्यासाठी क्शेत्राचा ताबा व हद्दी, खुणांचीतुम्हांला स्वतः पडताळणी करावी लागेल. तसेच सदर जमीन/प्लॉट साठी पोहोच रस्त्याची जागेवर जावुन स्वतः खात्री करावी लागेल. तसेच रस्ता दुसऱ्याच्या क्शेत्रातून जात असेल तर त्याचीही खात्री करून घ्यावी लागेल व तशी संमती संबधिताकडुन घ्यावी लागेल.
7. जमीन/प्लॉट/फ्लॅट/घरे/इमारती इ. स्थावर मिळकतींच्या मालकांची तुम्हांलास्वतः खात्री करून घ्यावी लागेल. कदाचित फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी ऑफिसवर असणार नाही.
8. मिळकत विक्री करणेकरीता तुम्हांला तुमच्या मिळकतींच्या संपूर्ण वारसांची-संबधित व्यक्तींची, दस्तऐवजांची खात्री घ्यावी/दयावी लागेल. भविश्यात त्या संदर्भात वाद उपस्थित झाल्यास त्यासआमचे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
9. संबधित मिळकतींवर एखादया बँकेचा, वित्तीय संस्थेचा बोजा आहे काय, तारण दिली आहे काय? याची खात्री करून त्याप्रमाणे तुम्ही व्यवहार पुर्ण करावयाचा आहे. भविश्यात असा काही बोजा असल्यास त्यास आमचे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
10. तुम्हीजमीन खरेदी/विक्री करण्यापूर्वी शक्यतो जमिनीची मोजणी करूनच तसेच हद्दी, बांध बांधलगतचे सहधारक यांची संमती घेवुनच व्यवहार पुर्ण करावयाचा आहे.
11. तुम्हांला7/12 च्या इतर हक्कात असलेल्या गोष्टीची पडताळणी करून त्यासंबंधी असलेल्या गोष्टीची पुर्तता करूनच व्यवहार पुर्ण करावा लागेल.
12. सदनिका/फ्लॅट/घरे, इमारती इ. खरेदी/विक्री करताना संबंधित मिळकतींचे मान्यतापात्र नकाशे, शासकीय परवानग्या, भोगवटाप्रमाणपत्रे, ताबा पावती, करारनामा, खरेदीखत, संबधितदस्ताऐवज इ. बाबींची पडताळणी करून व्यवहार पुर्ण करावा लागेल.
13. जमिनीस आरक्शण, कोर्ट वादाची माहीती संबंधितांकडुन लिहुन देणार यांना हमीपत्रावरून त्याच्या प्रमाणित प्रतींसह दयावी लागेल.
14. तुम्ही संपूर्ण रक्कम मिळाल्या/दिल्यानंतरच दस्तावर सही करून दस्तनोंदणीस हजर राहावे लागेल. कदाचीत रक्कम न देता/घेता दस्तनोंदणीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर आर्थिक देवाण घेवाण राहीली असल्यास त्यास आमचे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
15. तुम्हांला व्यवहारातुन होणाऱ्या आर्थिक उलाढालीची प्राप्तीकर विभागाच्या नियमांचेपालन करून व्यवहार करावा लागेल. भविश्यात त्याबद्दल काही कारवाई झाल्यास त्यास आमचे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
16. साठेखत, खरेदीखत इ. दस्ताऐवजांची नोंदणी करण्यापुर्वी तुम्हांला संपूर्ण फी अधिक व्यवहाराच्या रक्कमेप्रमाणे होणारी मूद्रांक शुल्क व नोंदणी फीसह होणारी संपुर्ण रक्कमआमचे कार्यालयाकडे जमा करावी लागेल.
17. कोणताही दस्त नोंदविणेपूर्वी 4 साक्शीदारांसह दस्तात नमुद घेणार व देणार यांची ओळख पटवूनच दस्त नोंदणीची प्रक्रीया तुम्हांला पुर्ण करावी लागेल. व्यक्ति खोटया आढळल्यास त्यास आमचे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
18. खरेदीची संपुर्ण कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर काही आर्थिक देवाण-घेवाण राहील्यास, फसवणूक झाल्यास त्याबाबतची कसलीही, कुठलिही तक्रार तुम्ही आमचेकडे घेऊन येणार नाही किंवा कुठलीही तक्रार इतरत्र करणार नाहीत असे तुम्हांला मान्य व कबुल आहे.
19. तुम्ही आमच्या कार्यालयाकडे दिलेली माहिती व कागदपत्रे खरी व बरोबर असुन सदर माहिती व कागदपत्रे खोटी आढळल्यास या कार्यालयाने अथवा संबधीत कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कायदेशीर कारवाईस तुम्ही स्वतः जबाबदार राहाल असे तुम्हाला मान्य व कबुल आहे.
20. आमचे कार्यालयामार्फत तुम्ही खरेदी/विक्री करण्याचा अथवा भाडेकरार, विकसनाचा व्यवहार कोणत्याही ठिकाणी पुर्णत्वास गेल्यास तुम्ही आमच्या कार्यालयाची सेवा शुल्क म्हणुन रक्कम रू. 10, 000/- (प्रत्येकी 5, 000/-) देणे ही तुमचेवर बंधनकारक राहील. ठरल्याप्रमाणे तुम्ही सेवा शुल्क स्वरूपात असणारी फी जमा नाही केली तुम्हीआमचे कार्यालयाने केलेल्या कायदेशीर कारवाईस पात्र राहताल असे तुम्ही मान्य व कबुल करतात.
21. व्यवहार पारदर्शक झाल्यामुळे तसेच तुमचाबऱ्याच मोठ्या रकमेचा फायदा झाल्यामुळे तुम्ही यातील कलम नं 2 चे तंतोतंत पालन करताल याची हमी तुम्हीआम्हांस देत आहेत.
22. दस्तनोंदणी झाल्यानंतर भविश्यात कधीही, कोणत्याही प्रकारची तक्रार तुम्हीआमचेकडे करणार नाहीत हे तुम्हांला मान्य व कबुल आहे.
23. आपल्या व्यवहार संबंधातील माहीती कधीही, कुणालाही आपल्या संमती शिवाय सांगितली जाणार नाही.
24. उपरोक्त सर्व अटी व शर्ती हे तुम्ही मान्य व कबुल करतात.